Top News महाराष्ट्र मुंबई

“मुंबईचा नाही, हा तर वरळीचा अर्थसंकल्प”

मुंबई |  3 फेब्रुवारी रोजी मुंबई महानगरपालिकेलचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. त्यावर समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मुंबई पालिकेने जाहीर केलेला अर्थसंकल्प हा मुंबईचा नाही तर हा वरळीचा अर्थसंकल्प, असं म्हणत रईस शेख यांनी सेनेवर सडकून टीका केली.

अर्थसंकल्प निवडणुकीच्या पूर्वीचा अर्थसंकल्प असल्यानं लोकांसाठी मोठमोठ्या घोषणा करणारा असेल असं वाटलं होतं. सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे आणि शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांची मुंबई महापालिकेवर पकड आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाबाबत आदित्य ठाकरे यांची छाप असेल हे आधीच माहिती असल्याचंही शेख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रईस शेख यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेना काय उत्तर देणार , हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“आता वर्ष उलटलं, यांना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईनच करत बसाव लागेल”

दारूड्यांनी रात्रीच्या वेळी ‘या’ अभिनेत्रीचा केला पाठलाग अन्…

अबब! या सेक्स रॅकेटवरील कारवाईनं पुण्यात खळबळ; इतक्या तरुणींना घेतलं ताब्यात

“महाविकास आघाडी सरकार फुटायला काही गंमत आहे का?, हिंमत असेल तर सरकार फोडून दाखवा”

“शरजिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणावं ही सर्वांची इच्छा पण इतकी आदळआपट का?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या