महाराष्ट्र मुंबई

“उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटीच नाही, तर मराठी सिनेमेही बनवणार”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना फिल्म सिटी तिकडे नेऊन दाखवा, असे आव्हान दिलं होतं. यावर उत्तर प्रदेशच्या फिल्म विकास परिषदेचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फिल्मसिटी किंवा बॉलिवूड ही काही वस्तू नाही जे कोणी एकडचे तिकडे उचलून नेईल. उद्धव ठाकरेंचे हे वक्तव्य आव्हान कमी आणि राजकारण जास्त वाटतं, असं राजू श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांना कदाचित त्यांना योगी आदित्यनाथांची काम करण्याची पद्धत माहिती नाहीय. त्यांनी एकदा मनावर घेतलं तर ते पूर्ण करूनच सोडतात, असंही राजू श्रीवास्तव म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटीसाठी ग्रेटर नोएडामध्ये जागा घेण्यात आली आहे. इतर कामे सुरु झाली आहेत. लवकरच इथे फिल्मसिटी उभारलेली दिसेल, असं राजू श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“राज्यपालांनी अर्णब गोस्वामींची चिंता करु नये, सरकार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतय”

‘त्या’ वक्तव्यावरून एकनाथ खडसेंनी मागितली ब्राह्मण समाजाची माफी!

‘माझ्या आत्महत्येला ठाकरे सरकार जबाबदार’; सुसाईड नोट लिहीत एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

“आम्ही अंतिम फेरीपर्यंत पोहचू शकलो नाही ही खरंच शरमेची गोष्ट”

‘त्या’ वक्तव्यावर खडसेंनी माफी मागावी अन्यथा…; ब्राम्हण महासंघाचा इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या