Top News देश

महाराष्ट्रसह देशातील ‘या’ राज्यातही कोरोनारूग्णांचा वाढला आकडा

Photo courtesy- Pixabay

मुंबई | महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पण फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतरही राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रासह केरळ, पंजाब, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे.

महाराष्ट्रानंतर पंजाब या राज्यामध्ये कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या पटीने वाढली. पंजाबमध्ये मागील 24 तासात 383 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली असल्याची महिती केंद्रीय मंत्रालयानं दिली आहे. महाराष्ट्रातही कोरोना रूग्णांची संख्या अचानक वाढू लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील काही भागात कडक निर्बंध लागू केले आहेत.

शुक्रवारी संपूर्ण देशामध्ये फक्त महाराष्ट्रात सर्वाधिक करोना रूग्णांची नोंद झाली. मागील 24 तासात 6112 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात सध्या 1 लाख 43 हजार 127 रूग्णांवर उपचार चालू आहेत. मागील सात दिवसांमध्ये केरळ राज्यात अनेक कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान, छत्तीसगडमध्येही कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. मागील 24 तासात तिथे 259 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. तर देशातील अॅक्टिव केसमधील महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यात 75.87 टक्के कोरोना रूग्ण असल्याचंही केंद्रीय मंत्रालयाने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, दिली ‘या’ तीन चेहऱ्यांना संधी

गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण वाढले, जाणून घ्या ताजी आकडेवारी!

…तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही?- करूणा शर्मा

कार्यालयीन वेळासंदर्भात मुख्यमंत्र्यांची थेट पंतप्रधानांकडे मागणी

मास्टरच्या गाण्यावर खेळाडू थिरकले, सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय ‘हा’ व्हिडीओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या