बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फक्त भारतच नाही तर ‘हे’ देशही 15 ऑगस्टला साजरा करतात स्वातंत्र्य दिन!

नवी दिल्ली | भारत आज 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. कोरोना लक्षात घेत सर्व नियमांचे पालन करत लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल. फक्त भारतच नव्हे तर आणखी चार देशही स्वातंत्र्य दिन साजरा करतात.

भारताव्यतिरिक्त दक्षिण कोरिया, कांगो, बहरीन, लिकटेंस्टीन हे देश त्यांचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी साजरा करतात. ही गोष्ट खूप कमी लोकांना माहित आहे. या चार देशांना ही 15 ऑगस्ट या दिवशीच स्वातंत्र्य मिळालं असल्यानं ते या दिवशीच स्वातंत्र्य दिन साजरा करतात.

दक्षिण कोरिया जपानकडून 15 ऑगस्ट 1945 रोजी स्वातंत्र्य मिळालं होतंं. फ्रान्सने कांगो या देशाला 15 ऑगस्ट 1960 रोजी स्वातंत्र्य केलं होतं. बहरीन या देशाला 15 ऑगस्ट 1971 रोजी ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळालं होतं. तसेच 15 ऑगस्ट 1866 रोजी लिकटेंस्टीन या देशाला जर्मनीकडून स्वातंत्र्य मिळालं होतं.

दरम्यान, 15 ऑगस्ट 1947 हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस. याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं. शेकडो लोकांच्या रक्ताने लाल झालेल्या भारताच्या मातीने स्वातंत्र्याचा आजचा दिवस पाहिला. 

थोडक्यात बातम्या –

‘प्रत्येक घरात वीज आणि शौचालय पोहोचलं आता…’; लाल किल्ल्यावरुन मोदींकडून नवी घोषणा

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात, 54 कोटींपेक्षा जास्त लोक लसवंत- नरेंद्र मोदी

लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहन

आज 75 वा स्वातंत्र्यदिन; पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहन करणार

“कष्टाने मिळालेलं स्वातंत्र्य वाचेल की नाही याची शंका निर्माण करणारं वातावरण सध्या देशात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More