…फक्त राम कदमच नाही तर मुख्यमंत्र्यांनीही माफी मागावी- धनंजय मुंडे

मुंबई | घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवात भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या वक्तव्यावरुन विरोधकांकडून चांगलाच समाचार घेण्यात येत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही ट्विटरवरून कदमांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

राम कदमांनी दहीहंडी कार्यक्रमात महिलांबद्दल केलेले वक्तव्य अतिशय दुर्दैवी आणि महिला भगिनींचे अवमान करणारे आहे. त्याच्या या वक्तव्यावरून त्यांनीच नाही तर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या मुख्यमंत्र्यांनीही समस्त महिला वर्गाची माफी मागावी, असं धनंजय मुंडेंनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, ‘मुलगी पसंत असेल तर तिला पळवून आणण्यासाठी तुमची मदत करेन’, असं अाक्षेपार्ह वक्तव्य राम कदमांनी केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘वाह रे भाजप सरकार, वाह रे मुख्यमंत्री तुमचा आमदार…’; मनसेची पोस्टरबाजी

-दिवस गोविंदांचा… मात्र चांदी झाली कलाकारांची

-…हे तुमच्या कोणत्या शिस्तीत बसते?, सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं

-न्यायालयाचा एक निर्णय अन् छगन भुजबळांना मिळाला मोठा दिलासा

-थोडं थांबा… मग मीच बघतो कसं काम होत नाही ते- शरद पवार