Top News महाराष्ट्र मुंबई

धार्मिक स्थळंच नाही, बारमध्ये जाणाऱ्या ग्राहकांमुळेही कोरोनाचा प्रसार- किशोरी पेडणेकर

मुंबई | फक्त धार्मिक स्थळंच नाही, तर बारमध्ये जाणाऱ्या ग्राहकांमुळेही कोरोनाचा प्रसार होतो, असं म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं सांगितलं.

कोव्हिडचा आकडा फुगत आहे. मात्र कोरोनाबाबत जनता गंभीर नाही. कोव्हिडचा आकडा वाढल्याने मुंबईकरांनी सावध राहावं. लांब पल्ल्याच्या गाड्या 15 दिवसांसाठी रद्द कराव्या, याबाबत शासनाने लवकर निर्णय घ्यावा. केवळ धार्मिक स्थळांमुळे कोरोना पसरतो, असं मी म्हटलं नाही, तर बारमध्ये जाणाऱ्या व्यक्तींमुळेही कोरोना पसरला, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संयमी आहेत, म्हणून इतर राज्यातील तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाच्या केसेस कमी आहेत, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्यात.

मुंबईचं राजकारण करण्याचा घाट दोन टक्क्याच्या लोकांनी घातला आहे, आम्ही त्यांना दाखवून देऊ आमची ताकद काय आहे, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी भाजपला लगावला.

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्रीपदासाठी सुप्रिया सुळेंना पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही, कारण…- चंद्रकांत पाटील

राज्यपाल समजूतदार आहेत, आमदारकीसाठी पाठवलेल्या नावांवर लवकरच निर्णय घेतील- छगन भुजबळ

शिवसेनेत सगळेच विद्वान एकापेक्षा एक; निलेश राणेंचा टोला

‘ही’ गोष्टी शिवसेनेच्या मूर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार?; काँग्रेस नेत्याची टीका

आयसीसीचा मोठा निर्णय! ‘या’ वर्षाखालील खेळाडू खेळू शकणार नाहीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या