बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यभरातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; सरकारकडून ‘या’ नियमात बदल

मुंबई | राज्य शासनाने कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली होती. आता त्याबरोबरच 10 एप्रिलपासून ॲन्टीजन चाचणीही ग्राह्य धरण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम कुमार गुप्ता यांनी नवीन सुधारणांचे आदेश काढले आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने  राज्यसरकारला ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत काही निर्बंध लावावे लागले होते. यामध्ये कोरोना लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य करण्यात आलं होतं. तसेच त्याची वैधता पंधरा दिवस ठरविण्यात आली होती. पण आता कामाच्या ठिकाणी आरटीपीसीआरचं नाही तर ॲन्टीजन चाचणीही ग्राह्य धरण्यात येणार आहे.

सार्वजनिक वाहतूक, खाजगी वाहतूक, चित्रपट, जाहिरात आणि चित्रवाणी मालिकांसाठी चित्रीकरण करणारे कर्मचारी, होम डिलिव्हरी सेवेमधील कर्मचारी, परीक्षा कार्यातील सगळे कर्मचारी व अधिकारी, लग्न समारंभातील कर्मचारी, अंतिम संस्कार करणारे कर्मचारी, खाद्य विक्री करणारे लोक, इतर कर्मचारी कथा कारखान्यातील कामगार, ई-कॉमर्स मधील व्यक्ती, बांधकाम क्षेत्रातील कर्मचारी यांसारख्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, आपले सरकार सेवा केंद्र, सेतू, सीएससी सेवा केंद्र, सेतू केंद्र, पारपत्र सेवा केंद्र आणि एक खिडकी सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय सेवा यांना सकाळी सात ते रात्री आठपर्यंत कार्यालये उघडे ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

नागपूरच्या वेल ट्रीट कोरोना रुग्णालयाला आग; 4 जणांचा मृत्यू

” उद्धव ठाकरेंना 40 दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल”

जम्बो कोविड सेंटर खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावेत- उद्धव ठाकरे

महाराष्ट्र कडक लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, राज्य सरकार कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत

धक्कादायक! ‘या’ काँग्रेस आमदाराचं कोरोनामुळे निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More