बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सरकारच्या हातालाच नव्हे तर बुद्धीलाही लकवा मारलाय”

सांगली | राज्यात एकीकडे कोरोनाची भयावह परिस्थिती सुरु आहे. तोच दुसरीकडे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप, टीकास्त्र पहायला मिळत आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगलीमध्ये बोलताना राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ पहायला मिळत आहे.

महाविकास सरकारकडून कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. सरकारची बुद्धी चालत नाहीये. या सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही. त्यामुळे या सरकारच्या हातालाच नव्हे तर संपूर्ण बुद्धीला लकवा मारला आहे, अशी जहरी टीका चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर केली आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्या आठ वर्षापूर्वी केलेल्या टीकेची यावेळी त्यांनी आठवण करुन दिली. तेव्हा सरकारचा पाठिंबा काढून घेण्यापूर्वी सरकारच्या हाताला लकवा मारला आहे असं पवार म्हणाले होते, असं देखील पाटील यांनी नमूद केलं.

थोडक्यात बातम्या – 

राज्यात पुन्हा शिवसेना-भाजप युती?; शिवसेना मंत्र्याचं मोठं वक्तव्य

पुणे जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व, पण अजित पवारांना मोठा धक्का

‘महाराष्ट्रात कोण काय म्हटलं याची उत्तरं द्यायला मी मोकळा नाही’; अजित पवार संतापले

Omicron नंतर ‘या’ नव्या व्हेरियंटचा शोध, ओमिक्रॉन, कोरोनापेक्षाही भयावह

Corona: केजरीवालांना कोरोना होताच दिल्लीत केली ‘ही’ मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More