बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एसटीचं विलीनीकरण नाहीच, कर्मचाऱ्यांचं निलंबन मात्र तातडीने रद्द होणार

मुंबई | गेल्या 14 दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी संपावर आहेत. तसेच ऐन दिवाळीत कर्मचारी संपावर गेल्याने आणि महाराष्ट्रातील लाल परी बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अशातच आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे.

एसटीच्या विलीगीकरणाबाबत समितीने निर्णय घेयचा आहे. समिती जो निर्णय तो आम्हाला मान्य असेल, असंही अनिल परब यानी सांगितलं आहे. संप मागे घेतला नाही तर शासन म्हणून जो निर्णय घेता येईल तो आम्ही घेऊ, असंही अनिल परब म्हणाले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन तातडीन हजर व्हा, असं आवाहन परब यांनी केलं आहे. तर ज्या कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यांचं निलंबन रद्द करण्यात आलं असल्याचं देखील परब यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी अद्याप त्यांच्या भूमिका स्पष्ट केली नाही. आझाद मैदानात साडेसात वाजता भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ; अनिल परब यांची घोषणा

डीजेच्या आवाजामुळे 63 कोंबड्यांचा मृत्यू, मालकाने थेट पोलीस स्टेशन गाठलं

‘या’ महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार; राजेश टोपेंचा गंभीर इशारा

23 वर्षीय तरुणीचा 14 वर्षाच्या मुलावर बलात्कार, तर बहिणीवर प्रियकराचे अत्याचार

“राष्ट्रवादीला निवडणुकांमध्ये अधिक जागा मिळाव्यात अशी तरुणांची अपेक्षा”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More