बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फक्त याच नाही, मागच्या सरकारने देखील अन्यायच केला- ज्येष्ठ IPS अधिकारी संजय पांडे

मुंबई | सध्या राज्यभर चर्चेत असलेल्या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश उद्योगपती मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणामुळे राज्य सरकारने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली केली. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केली असून त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मात्र परबमीर सिंह यांच्यासोबत बदली झालेले दुसरे ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे.

फक्त हेच सरकार नाही तर याआधीच्या सरकारने देखील माझ्यावर अन्यायच केला आहे. वरिष्ठ पदांसाठी बदल्या आणि नियुक्त्या करताना सेवाज्येष्ठतेकडे दुर्लक्ष केलं गेलं. राज्याच्या विद्यमान सरकारची कृती ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांना धरून नाही, असं संजय पांडे यांनी म्हटलं आहे.

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश शेठ यांच्यकडे कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची बदली झाली असून हेमंत नगराळे नवे मुंबई पोलीस आयुक्त असणार आहेत. त्यासोबतच संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परमबीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, अधिकाऱ्यांची बदली केल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली होती. मात्र संजय पांडे यांनी मागील सरकारमध्ये अन्याय झाला असल्याचं म्हटलं आहे. यावर फडणवीस काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

…अन् प्रवाशांनी खचाखच भरलेली रेल्वे जेव्हा उलटी धावायला लागते, पाहा व्हिडिओ

फाटलेली जीन्स युवा सांभाळतील पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?- उर्मिला मातोंडकर

ऐकावं ते नवलचं! ट्रकमध्ये हेल्मेट नाही घातलं म्हणुन चालकाला तब्बल एवढा दंड!

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अतिशय प्रामाणिक आणि नम्र व्यक्ती”

नुसता झगमगाट!!! ऊर्जामंत्र्यांच्या बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More