नाशिक | नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात एकच गोंधळ उडाला. या मागचं कारण म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil ) यांचा नंबर नॉट रिचेबल लागला आणि त्यामुळे राजकारणात चर्चेला उधाण आलं.
दरम्यान यानंतर, शुभांगी पाटील या समोर आल्या आणि मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. पुढे त्या म्हणाल्या की, ‘मी कुठेही गेले नव्हते. माला ठाकरे गटाचा पाठिंबा आहे.
माध्यमांशी बोलत असताना त्या म्हणाल्या की, मी अनेक शिक्षक संघटनांशी चर्चा केली आहे. पेन्शन योजना असेल किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न असेल यासाठी मी निवडणुकीला उभी राहणार आहे. आणि ते मला पाठिंबा देणार आहेत असा, मला विश्वास आहे असं वक्तव्य शुभांगी यांनी केलं.
सत्यजित तांबे यांच्या बद्दल बोलत असताना त्या म्हणाल्या की माला नाही माहित काॅंग्रेस तांबे बद्दल काय निर्णय घेईल. माला माहाविकास आघाडीवर पूर्ण विश्वस आहे ते माला पाठींबा देणार.
मी अपक्ष उमेदवार असल्यामुळे मला कुणीही संपर्क केला नाही. गिरीश महाजन यांनी संपर्क केला की नाही, त्यावर मी बोललेलं बरं नाही, असंही पाटील म्हणाल्या.
थोडक्यात बातम्या-
ज्याच्या पराभवाची चर्चा होतेय तो सिकंदर कोण?
सर्वात मोठी बातमी! काँग्रेस हायकमांडचा सत्यजित तांबेंना झटका
“मी पूर्ण कपड्यांत फिरते, बाकीच्यांचं मला माहित नाही”
“स्वत:च्या लेकरावर हात ठेवून सांगावं, की त्यांनी…”
चौकशीला जाण्याआधी इक्बाल सिंह चहल यांनी केली ‘ही’ मोठी मागणी!