बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

समीर वानखेडे नाही तर ‘हे’ अधिकारी करणार आर्यन खान प्रकरणाचा तपास

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला रोज वेगवेगळं वळण लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. आर्यन खान प्रकरणाचा तपास करणारे एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी काही गंभीर आरोप केले.आरोप प्रत्यारोपाच्या अनेक फैरीनंतर आर्यन खान प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंकडून काढून घेण्यात आला.

फक्त आर्यन खान प्रकरणच नाही तर नवाब मलिक यांचे जावई समीर खान प्रकरणासह एकूण 6 प्रकरणाच्या तपासाचं नेतृत्व समीर वानखेडे करत होते. पण या प्रकरणांच्या तपासाची धुरा आता दिल्ली एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंग यांच्या हाती सोपवण्यात आली आहे.

या निर्णयानंतर दिल्ली एनसीबीकडून स्पष्टीकरण जारी करण्यात आलं आहे. दिल्ली एनसीबीने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार कोणत्याही अधिकाऱ्याला तपासावरून हटवण्यात आलं नाही. त्यामुळे समीर वानखेडेसह त्यांच्या पथकातील सर्व अधिकारी या तपासाचा भाग असतील पण त्यांना संजय सिंगच्या निर्देशांचे पालन करावे लागणार आहे.

दरम्यान, मला या तपासावरून वगळण्यात आलेलं नाही, या प्रकरणाचा तपास कोणत्यातरी केंद्रीय एजन्सी मार्फत व्हावा अशी याचिका मी न्यायालयात दाखल केली होती. त्यानुसार दिल्ली एनसीबीची एसआयटी टीम या प्रकरणांचा तपास करणार असल्याची माहिती समीर वानखेडेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत चढउतार सुरूच, जाणून घ्या आजची आकडेवारी

‘मला हटवलं नाही तर मी…’, समीर वानखेडेंनी दिलं स्पष्टीकरण

शाब्बास पुणेकर! पुण्यात आज एकाही कोरोनाबाधिताच्या मृत्युची नोंद नाही

समीर वानखेडे यांना हटवल्यानंतर नवाब मलिकांचं पहिलं ट्विट, म्हणाले…

जाणून घ्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची ताजी आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More