फडणवीस नव्हे हे तर ‘फसणवीस’ सरकार; सुप्रिया सुळेंचा जोरदार हल्लाबोल

सिंदखेडराजा | फडणवीस नव्हे हे तर ‘फसणवीस’ सरकार, असा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर खासदार सुप्रिया सुळेंनी केला.

सिंदखेडराजा येथील नगरपरिषदेच्या मैदानावर आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या 

राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने शेतकरी कर्जमाफी छत्रपती शिवरायांच्या नावाने केली. मात्र कोणाचीही कर्ज माफी अद्याप झाली नाही, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, राष्ट्रवादीची सत्ता आली तर अजित दादांना पहिली सही ‘सिंदखेडराजा’च्या विकासनिधीवर करायला लावेल, असंही सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेसने मला 12 वर्षे छळण्याचा प्रयत्न केला- नरेंद्र मोदी

-सिडनी एकदिवसीय सामन्यात नोंदवलेले ‘हे’ 9 विक्रम तुम्ही वाचाच!

-…अन्यथा उत्तर प्रदेशात आम्ही स्वबळावर लढू!- काँग्रेस

-…जेव्हा DRS भारतीय संघाला महागात पडतो आणि भारताचा पराभव होतो!

-…तर अजित दादांना पहिली सही ‘सिंदखेडराजा’च्या विकासनिधीवर करायला लावेन- सुप्रिया सुळे