Top News देश

राजकीय संन्यास घेण्याचं बोललोच नाही- नितीश कुमार

पाटणा | नजीकच्या काळात राजकीय संन्यास घेण्याचा आपला कोणताही इरादा नाही, आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यास आला, असं म्हणत नितीश कुमार यांनी यूटर्न घेतला.

मी निवृत्तीबद्दल बोललो नाही… मी प्रत्येक निवडणुकीच्या शेवटच्या रॅलीत नेहमी हेच म्हणतो.. अंत भला तो सब भला तुम्ही माझं भाषण संपूर्ण ऐकलं, तर तुम्हाला संदर्भ लागेल आणि सर्व स्पष्ट होईल, असं नितीश कुमार यांनी सांगितलं.

बिहारच्या पूर्णियामध्ये जेडीयू उमेदवाराचा प्रचार करताना नितीश कुमार यांनी भावनिक साद घातली होती निवडणुकीचा आज अखेरचा दिवस आहे. यानंतर निवडणुका संपतील आणि ही माझी अखेरची निवडणूक आहे. अंत भला तो सब भला, असं नितीश म्हणाले होते.

नितीश कुमार हे आतापर्यंत सहा वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिले असून यावेळी ते सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

महत्वाच्या बातम्या-

सोमय्या हे शिखंडी, केवळ साडी नेसवणं बाकी; किशोरी पेडणेकरांची बोचरी टीका

“उद्धव ठाकरेंनी शपथविधीनंतर 345 कोटी बिल्डरला गिफ्ट दिले”

“ठाकरे कुटुंबाचे 40 पैकी 30 जमिनींचे व्यवहार अन्वय नाईक यांच्याशी कसे?”

‘मत खाणाऱ्यांबाबत भाजपने निर्णय घ्यावा’; नितीश कुमारांचा चिराग पासवानांवर हल्लाबोल

…म्हणून ट्विटरकडून काही तासांसाठी अमित शहा यांचा प्रोफाईल फोटो ब्लॉक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या