सचिन वाझेंनी वापरलेल्या ‘त्या’ मर्सिडीज गाडीत सापडलं नोटा मोजण्याचं मशीन आणि…
मुंबई | मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं असलेली कार सापडली होती. त्यानंतर या प्रकरणाला दिवसेंदिवस वेगळं वळण लागलेलं दिसत आहे. पुढे सचिन वाझे यांना पोलिस दलातून निलंबीत करण्यात आलं तर एनआयएनं तपास हाती घेतल्यावर सचिन वाझेंना अटक सुद्धा केली आहे. या प्रकरणात स्काॅर्पिओ गाडी नंतर आता मर्सिडीज गाडी एनआयएनं ताब्यात घेतली आहे.
सचिन वाझे तपास प्रकरणात आता मर्सिडीज गाडी चर्चेत आली आहे. या गाडीत एनआयएला 5 लाख रूपये रोख, पैसे मोजण्याची मशीन आणि काही कपडे सापडले आहेत. त्याचबरोबर ही गाडी सचिन वाझे वापरत होते असंही आता समोर येत आहे. तर या मर्सिडीज गाडीत काही बनावट नंबर प्लेट देखील सापडल्या आहेत.
याप्रकरणात एका मागोमाग एक गोष्टी समोर येत आहे. त्यानंतर या सर्व गोष्टी एनआयएने ताब्यात घेतल्या आहेत. गाडी सचिन वाझे चालवत होते. ही गाडी कोणाची आहे या बद्दल आधिक तपास चालू आहे. तर कपडे आणि नंबरप्लेटबद्दल देखील तपास चालू आहे, असं एनआयएच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितलं आहे.
दरम्यान, सचिन वाझे प्रकरणाचा एनआयएकडून कसून तपास चालू आहे. वाझेंवर फसवणूक, विस्फोटक बाळगणे, बनावट मोहर बनवणं आणि धमकी देण्याचे आरोप लावण्यात आले आहेत. तसेच तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली होती. तसेच एनआयएच्या हाती आता काहीतरी सबळ पुरावा लागल्याचं बोललं जात आहे.
थोडक्यात बातम्या-
MPSC ची तारीख तर ठरली पण…; विद्यार्थ्यांसमोर आणखी नवा पेच
माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचं कोरोनामुळे निधन
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना आईची आठवण आल्याने केली भावनिक कविता शेअर!
बटलरची खेळी विराटवर भारी; दणदणीत विजयासह इंग्लंड मालिकेत आघाडीवर
‘या’ महापालिका हद्दीतील शिक्षकांना घरून काम करण्याचे आदेश!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.