नोटाबंदीमुळे 15 लाख लोकांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, रोजगारही घटला!

संग्रहीत फोटो

मुंबई | नोटाबंदी यशस्वी झाल्याचे कितीही दावे सरकारकडून केले जात असले तरी ते खोटं असल्याचं समोर आलंय. नोटाबंदीनंतरच्या 4 महिन्यांमध्ये देशात 15 लाख लोकांनी रोजगार गमावलाय. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी’च्या आकडेवारीतून समोर आलीय. 

शेअर बाजारात ज्या कंपन्या नोंद आहेत त्या कंपन्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत रोजगार घटला आहे, अशी ही आकडेवारी सांगते.

दरम्यान, लेबर ब्युरो एम्लॉयमेंटनंही नोटाबंदीमुळे रोजगार घटल्याचं मान्य केलंय. असंघटीत क्षेत्राला या निर्णयाचा सर्वात मोठा फटका बसलाय, असं ही आकडेवारी सांगते.