काही होणार नाही; प्रकरण वाझे साहेबांकडेच आहे; मनसुख हिरेन यांचं भावासोबतचं संभाषण ‘एनआयए’कडे
मुंबई | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण झाला आहे. ‘एटीएस’ कडून लवकरच याबद्दलची अधिकृत माहिती दिली जाऊ शकते. ‘एटीएस’चे प्रमुख जयजीत सिंह यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही भेट घेतली. ‘एटीएस’चा तपास जवळपास पूर्ण झाला असताना मनसुख हिरेन आणि त्यांचे भाऊ विनोद यांच्यात झालेलं एक फोन संभाषण समोर आलं आहे.
25 फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळून आली होती. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. त्यानंतर 27 फेब्रुवारीला मनसुख हिरेन आणि त्यांचे भाऊ विनोद यांच्यात फोनवरुन संभाषण झालं.
संभाषणाची रेकॉर्डिग ‘एटीएस’ आणि ‘एनआयए’कडे आहे. या संवादातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
मनसुख हिरेन आणि विनोद यांच्यातील संभाषण –
विनोद- झोप झाली का? काय झालं?
मनसुख- माझा जबाब नोंदवून घेतला. आता पुन्हा जावं लागणार नाही.
विनोद- जबाबात काय लिहून घेतलं? ती गाडी सचिन वाझेही चालवायचे हे जबाबात सांगितलंस ना?
मनसुख- नाही, मी जबाबात तसं म्हटलं नाही.
विनोद- का नाही सांगितलंस?
मनसुख- ती गाडी मी चालवतो हे कोणालाही सांगू नकोस, असं सचिन वाझेंनी सांगितलं होतं. त्यामुळे मी जबाब नोंदवताना तशी माहिती दिली नाही.
विनोद- तू ही गोष्ट चुकीची केलीस. यामुळे कोणती गडबड तर होणार नाही ना?
मनसुख- काही नाही होणार, हे प्रकरण साहेबांकडेच आहे.
विनोद- एटीएसचं पथकही चौकशी करताना तुला माहिती विचारेल.
मनसुख- साहेबांकडे (सचिन वाझे) सर्व पेपर आहेत. साहेबच प्रमुख आहेत. आता पुढे काही होणार नाही.
थोडक्यात बातम्या –
चुकीला माफी नाही! राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्यांवर अखेर गुन्हा दाखल
अवघ्या 23 वर्षांची अंकिता झाली ‘या’ गावची सरपंच; गावाबद्दल असलेलं स्वप्न ऐकूण तुम्हीही व्हाल थक्क
परमबीर केंद्र सरकारचा बोलका पोपट; अंडरवर्ल्डशी लिंक असलेल्यांशी घरोब्याचे संबंध- विनायक राऊत
शरद पवारांकडून गृहमंत्र्यांना क्लीनचीट, मात्र काँग्रेस म्हणते मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा!
मी आनंदी आहे, आता ATS करेक्ट कार्यक्रम करेल- शरद पवार
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.