Top News

‘दोन दिवसात उत्तर द्या अन्यथा…’, सचिन पायलट यांना काँग्रेसची नोटीस

जयपूर | उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून सचिन पायलट यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाकडून बोलावण्यात आलेल्या विधिमंडळ पक्ष बैठकांना गैरहजर राहिल्याने सचिन पायलट यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

सचिन पायलट यांच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या 18 जणांना नोटीस पाठवण्यात आली असून दोन दिवसात उत्तर देण्यास सांगण्यात आल आहे. अन्यथा विधिमंडळ पक्षाचं सदस्यत्व रद्द केलं जाणार आहे. राजस्थानमधील काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

सचिन पायलट आणि इतर 18 सदस्यांनी जर दोन दिवसांत उत्तर दिलं नाही तर विधिमंडळ पक्षातून आपलं सदस्यत्व रद्द करत आहेत असं समजलं जाईल, असं अविनाश पांडे यांनी म्हटलं आहे.

देव सचिन पायलट यांना शहापपणा देवो, आणि त्यांनी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करु नये. त्यांना आपली चूक मान्य करावी. सचिन पायलट यांना चर्चा करण्यासाठी दरवाजे नेहमी खुले होते, आजही आहेत. पण आता गोष्टी फार पुढे गेल्या आहेत. आता त्यांचा काही फायदा होणार नाही, असंही अविनाश पांडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून 25 वर्षीय महिलेनं महिला पोलिसाचा हात पिरगळला; महिलेला अटक

आता पूर्वीच आयुष्य कधीच जगता येणार नाही; WHOचा धक्कादायक इशारा!

सचिन पायलट भाजपमध्ये प्रवेश करणार का?; केला सर्वात मोठा खुलासा…

महिला पोलिसानं पती सांगून दुसऱ्याच पुरुषाला स्वतःसोबत केलं क्वारंटाईन; त्याच्या पत्नीनं…

…तर ते पद काय कामाचं?; सचिन पायलट यांनी केला मोठा खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या