बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ईडी लावाल तर सीडी लावेल म्हणणाऱ्या नाथाभाऊंनाही ईडीची नोटीस???

मुंबई | भाजपचे फायरब्रँड म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी प्रवेश करताना त्यांनी आपल्या भाषणात, माझ्यामागे सीडी लावाल तर आम्ही सीडी लावू, असं एकनाथ खडसे म्हणाले होते. मात्र आता एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस आली आहे.

एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी 13 तास कसून चौकशी केल्यानंर गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंनाही ईडीची नोटीस आल्याची माहिती समजत असून त्यांना गुरूवारी चौकशीसाठी बोलवण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे.

गिरीश चौधरी यांना अटक झाल्यामुळे एकनाथ खडसेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया देताना खडसेंना अटक करून काही फायदा नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, खरं तर ईडीने चौधरी यांना सर्वात आधी चौकशीसाठी बोलावणं गरजेचं होतं. त्यामुळे ही अटक आधीच झाली असती पण राजकारण म्हणून ईडी खडसेंनाच बोलावत होती. वास्तविक हा मनी लॉन्ड्रिंगचा विषय आहे. एका कंपनीच्या खात्यातून खडसेंचे जावई आणि पत्नीच्या खात्यात पैसे जमा झाले आणि त्यानंतर त्यांनी हा भूखंड खरेदी केला आहे. त्यामुळे यात खडसेंची चौकशी करण्यात काहीच अर्थ नाही, असं अंजली दमानिया यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

प्रकाश जावडेकर यांचा राजीनामा का घेण्यात आला?; वाचा सविस्तर वृत्त

“बारा वर्षात काँग्रेसला राणेंची किंमत काय आहे कळलं नाही ते भाजपच्या नेतृत्वाला कळलं”

सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, उच्चांकी दरापेक्षा 8500 रुपयांनी स्वस्त; वाचा ताजे दर

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणेंनी सर्वप्रथम घेतली शपथ

रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांच्यासह 12 मंत्र्यांचे राजीनामे राष्ट्रपतींनी केले मंजूर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More