बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस

मुंबई | आदेशानंतरही सुविधांची थकबाकी न दिल्याबद्दल उत्तराखंड उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

रूरल लिटिगेशन अँड एटाइटलमेंट सेंटर यांच्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी माजी मुख्यमंत्र्यांकडे घर व इतर सुविधांबाबतची थकबाकी सहा महिन्यांच्या आत जमा करण्याचे आदेश दिले होते.

सहा महिन्यानंतरही थकबाकी न भरल्याने आरएलएसीने हायकोर्टात अवमान याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणी करताना या आदेशाचे पालन का केले नाही आणि या माजी मुख्यमंत्र्यांविरूद्ध अवमान कारवाई का केली जाऊ नये, असा सवाल कोर्टाने सरकारला केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही- नरेंद्र मोदी

“नाथाभाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण”

दहावी, बारावीची फेरपरीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार!

“बाबा या वयात मी इतका फिरतो तू किमान घराबाहेर पड, असं पवारांना म्हणायचं असेल”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More