बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लेकाच्या पाठोपाठ आता बापही अडचणीत, नारायण राणेंना पोलिसांकडून नोटीस

सिंधुदुर्ग | भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) चांगलेच अडचणीत आले आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी संतोष परब (Santosh Parab) यांना मारहाण केल्याचे आरोप नितेश राणे यांच्यावर आहेत. याप्रकरणी लवकरच त्यांना अटकही केली जाण्याची शक्यता आहे. मात्र आता नितेश राणेंच्या पाठोपाठ केंद्रीय मंत्री नारायण राणे (Central Minister Narayan Rane) यांनाही कणकणवली पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

राणे यांनी काल पत्रकार परिषद घेत नितेश राणे प्रकरणावर चर्चा केली होती. यावेळी त्यांनी मला माहीत आहे नितेश राणे कुठे आहेत ते पण मी का सांगू? तसेच नितेश राणे कुठे आहेत हे सांगायला मी मूर्ख आहे का? असं वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्यामुळे नारायण राणे अडचणीत आले आहेत. पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशन मध्ये हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

कणकवली पोलिसांनी राणेंना पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची नोटीस बजवाली होती. पोलीस नारायण राणेंची चौकशी करणार आहेत. नितेश राणेंविषयी माहिती घेण्यासाठी पोलिसांनी नारायण राणेंना बोलावलं आहे. त्यामुळे आता मुलाच्या पाठोपाठ नारायण राणेदेखील चांगलेच अडणीत आले आहेत.

दरम्यान, नितेश राणे संतोष परब मारहाण प्रकरणात अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. शिवाय नितेश राणे यांनी विधानसभेसमोर आदित्य ठाकरेंना डिवचल्यावरूनही सध्या गदारोळ माजला आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी लवकरात लवकर नितेश राणेंना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…माझ्यावर दबाव आणला जाऊ शकत नाही’; मुख्यमंत्र्याच्या पत्रावर राज्यपालांची नाराजी

‘…अन्यथा अजून कडक निर्बंध लावले जातील’; राजेश टोपेंचा गंभीर इशारा

विदर्भात आजही पावसाची शक्यता, ‘या’ भागात यलो अलर्ट जारी

मोठी बातमी! भाजप आमदार नितेश राणेंना न्यायालयाचा मोठा झटका

“…याला समलिंगी संभोगाचे आकर्षण आहे, हे कोण सिद्ध करणार?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More