बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नारायण राणेंना पोलिसांकडून नोटीस; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | भाजप आमदार नितेश राणेनंतर (Nitesh Rane) आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या (Narayan Rane) अडचणींत वाढ झाली आहे. नारायण राणेंना कणकवली पोलिसांकडून चौकशीला हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. नितेश राणे हे नॉट रिचेबल असल्याने पोलिसांनी आता नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली. याप्रकरणी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नारायण राणेंच्या मागे भाजप खंबीरपणे उभे आहे. राज्यात पोलिसांना दरोडेखोर, बलात्काऱ्यांना पकडायला वेळ मिळत नाही. मात्र घरावरती जाऊन नोटिसा चिकटवतात हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, याचा मी निषेध करतो, अशी तिखट प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार आहे आता यातच नारायण राणेंच्याही अडचणींत वाढ पहायला मिळत आहे. त्यामुळे आता राणे कुटुंबाच्या अडचणींत चांगलीच वाढ झाली आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणुकीतील प्रचार प्रमुख शिवसेना कार्यकर्ते संतोष परब (santosh parab) हल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंवर (Nitesh Rane) आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी नितेश राणेंवर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘कोणीही अतिशहाणपणा शिकवू नये’; संजय राऊतांचा राणेंवर हल्लाबोल

‘…तर ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते’; आदित्य ठाकरेंचा सूचक इशारा

लेकाच्या पाठोपाठ आता बापही अडचणीत, नारायण राणेंना पोलिसांकडून नोटीस

‘राजकारणाच्या हमाम मे सब नंगे है’; संजय राऊतांचा हल्लाबोल

Corona: राष्ट्रवादी काॅंग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More