देश

दिलासादायक! गेल्या 14 दिवसात 78 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश चिंतेमध्ये आहे. एकाबाजूला कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची वाढती संख्या तर दुसऱ्याबाजूला अर्थव्यवस्था ठप्प असल्याने रोजगाराची चिंता. देश अशा दुहेरी संकटाचा सामना करत असताना एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

मागच्या 14 दिवसात देशातील एकूण 78 जिल्ह्यांमध्ये एकाही व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झालेली नाही, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

देशातील वेगवेगळया राज्यांमध्ये मोठया प्रमाणावर कोरोनाच्या चाचण्या सुरु आहेत. त्यामुळे नेमकी किती लोकांना कोरोनाची लागण झाली आहे ते समोर येत आहे. मागच्या 24 तासात देशात 1409 नागरिकांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.

दरम्यान, सध्या देशात एकूण 21,393 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयचे सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

महसूल मिळावा म्हणून वाईन शाॅप सुरु करा- राज ठाकरे

लॉकडाऊननंतर रेल्वे सोडा नाहीतर अडकून पडलेले कामगार-मजूर रस्त्यावर येतील- अजित पवार

महत्वाच्या बातम्या-

‘साधूंचे मारेकरी, भाजपचे पदाधिकारी’ म्हणत काॅंग्रेसने ट्विटरवर सादर केला पुरावा

“दारुच्या पैशातून मिळणारा महसूल महिलांचा शाप; राज्य सरकारने तो स्वीकारु नये”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या