बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ कार्सवर मिळतोय 60 हजारांचा डिस्काऊंट; जाणून घ्या अधिक माहिती

नवी दिल्ली | आपल्याकडे चार चाकी गाडी असावी हे प्रत्येकाचं स्वप्न आहे. मात्र मी बजेटमुळे काहींना ते शक्य होत नाही. तर काहींना गाड्यांवरच्या ऑफर्स माहीत नसल्यामुळे त्यांची स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग त्यांच्या पर्यंत पोहोचत नाही. यादरम्यानच 3 लाखांपेक्षा कमी किंमतीत 3 गाड्यांचा समावेश होतो. एवढचं नाही तर ह्या गाड्या जबरदस्त मायलेज देखील देतात. तसेच या गाड्यांवर 60 हजारांचा डिस्काऊंट सुद्धा मिळतो आहे.

किंमत 3 लाखांपर्यंत असून त्यावर 60 हजारांचा डिस्काऊंट देणाऱ्या या गाड्यांमध्ये डॅटसन रेडी-गो, मारुती अल्टो 800 आणि रेनाॅल्ट क्वीड यांचा समावेश होतो. या महिन्यात मिळणाऱ्या ऑफर्सनुसार अल्टो 800 वर 20,000 रुपयांची रोख सुट मिळणार आहे. तसेच 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4000 रुपयांचा काॅर्पोरेट डिस्काऊंट देखील दिला जात आहे. मात्र मारुती अल्टो 800 ची एक्स शोरुम किंमत 2.99 लाख आहे.

डॅटसन रेडी-गो या कारची एक्स शोरुम किंमत 2.83 लाख असून सध्या मिळणाऱ्या ऑफर्सनुसार या कारवर 45,000 रुपयांची सुट देण्यात आली आहे. म्हणजेच 15,000 रुपयांचा रोख डिस्काऊंट, एक्सचेंज बोनस आणि काॅर्पोरेट डिस्काऊंट. ही ऑफर 31 मार्चपर्यंत मर्यादित आहे.

रेनाॅल्ट क्वीडची एक्स शोरुम किंमत 3.13 लाख इतकी आहे. मात्र कंपनी या कारवर 60,000 रुपयांची सवलत देत आहे. 2020 माॅडेलवर 20,000 तर 2021 माॅडेलवर 10,000 रुपयांची सुट देण्यात येत आहे. तसेच या कारवर 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, 10,000 रुपयांचा लाॅयल्टी बोनस तर 10 हजार रुपयांचा काॅर्पोरेट डिस्काऊंट दिला जात आहे. मात्र ग्रामीण भागातील लोकांसाठी डिस्काऊंटच्या जागी 5000 रुपयांची खास ऑफर दिली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

अभिनेत्री सायली संजीवचा बोल्ड अंदाज, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

सचिन वाझेंनंतर ठाण्यातील एका नेत्याची चौकशी होणार?

“सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करा, दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ दे”

राजस्थानवरून आलेल्या त्या 180 वऱ्हाड्यांनी वाढवलं पालघरचं टेंशन; इतक्या जणांना कोरोनाची लागण

‘…हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत’; संजय राऊतांचा ठाकरे सरकारला इशारा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More