बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन भर रस्त्यात महिलेला काही समजण्याच्या आत तरूणाने घेतला किस, व्हिडीओ तुफान व्हायरल!

नवी दिल्ली | पाकिस्तानमध्ये लोकशाही म्हणजे एक प्रकारे थट्टाच समजली जाते. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी हे वेळोवेळी सिद्ध करून दाखवलं आहे. पाकिस्तानात महिला आपल्या न्याय आणि हक्कासाठी लढत आहेत. देशाची संस्कृती टिकण्यासाठीही त्या देशातील महिलांना हीन वागणूक दिली जाते. त्यातच आता पाकिस्तानात महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एक रिक्षा दिसत आहे. एका चौकात सिग्नलला थांबल्यामुळे रिक्षाचा वेग कमी झाला. या रिक्षामध्ये दोन महिला आणि एक बारका मुलगा बसलेला दिसत आहे. चौकाच्या जवळ आल्यानंतर सर्व गाड्या हळू होतात. त्याचबरोबर रिक्षाचा वेग देखील कमी होतो. तेवढ्यात एक पुरूष रिक्षाकडे धावत येतो.

रिक्षात बसलेल्या दोन महिलांपैकी उजव्या बाजूला बसलेल्या महिलाकडे तो पुरूष वेगाने जातो. त्या महिलेला काही कळण्याच्या आतच तो त्या महिलेच्या गालावर किस करतो आणि पुढे पळत जातो. त्या महिलेला काहीही कळत नाही. पुरूषाने केलेल्या कृत्याने महिलेला झटकाच बसतो.

दरम्यान, रिक्षाच्या मागे गाडी चालवत असलेल्या पुरूषाच्या एका सहकाऱ्यानं हा व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अश्लील कृत्य केलेल्या पुरूषावर कारवाईची मागणी केली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

बैलगाडा शर्यतीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा; म्हणाले…

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

जेतेपदावर नाव कोरण्यासाठी कोहलीचा नवीन डाव?, संघात केले ‘हे’ मोठे बदल

‘गुन्हा दाखल करायचा असेल तर…’; खासदार संभाजीराजे भोसले कडाडले

शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला भाजपमध्ये येण्यास नारायण राणेंची खुली ऑफर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More