महाराष्ट्र सोलापूर

कुत्र्यापाठोपाठ आता गायींच्या गळ्यातही सदाभाऊंच्या नावाच्या पाट्या!

सोलापूर | दूध दरवाढीवरून शेतकरी संतप्त झाले अाहेत. शेतकऱ्यांनी चक्क गायींच्या गळ्यात राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि महादेव जानकरांच्या पाट्या अडकवलेल्या पाहायला मिळाल्या.

दूध दरवाढीवरून राज्यात आंदोलन सुरू आहे. आज ठिकठिकाणी शेतकरी जनावरांना घेऊन चक्का जाम करत आहेत. सोलापूरमध्ये शेतकऱ्यांनी गायींच्या गळ्यात खोत आणि जामकरांच्या पाट्या लावून चक्का जाम केला.

दरम्यान, आंदोलनाचा आज चौथा दिवस असून दूध उत्पादक शेतकरी आक्रमक होत आहेत. मुंबई आणि पुण्याला आज या आंदोलनामुळे दूध पुरवठा जवळपास बंद राहणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-डोंबिवलीचे रस्ते बनवताना खडीसोबत डांबराऐवजी साखर वापरली!

-दूध दरवाढ आंदोलन चिघळलं; कार्यकर्त्यांकडून एसटी बसची तोडफोड

-परळीत मराठ्यांचा रात्रभर ठिय्या; अजूनही आंदोलन सुरूच

-विराट कोहलीच्या ‘त्या’ निर्णयावर व्हीव्हीएस लक्ष्मण भडकला!

-आदित्य ठाकरेंच्या येण्यानं सेना आमदार ‘प्रश्नाळू’; अजित पवारांनी काढला चिमटा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या