मनोरंजन

आता मालिकेतूनही दिसणार आर्ची-परश्याचं प्रेम!

मुंबई |  आर्ची आणि परश्या यांच्या प्रेमावर आधारित असलेला आणि चित्रपटसृष्टीवर आधिराज्य गाजवलेल्या ‘सैराट’या चित्रपटावर आधारित हिंदी मालिका लवकरच छोट्या रूपेरी पडद्यावर येणार आहे.

‘सैराट’या चित्रपटावर आधारित मालिकेचं नाव ‘जात ना पूछो प्रेम की’ असं आहे. यात अभिनेता किंशूक वैद्य आणि अभिनेत्री प्रणाली राठोड हे दोघं आर्ची आणि परश्याची भूमिका करणार आहेत. आर्ची- परश्याची ही कथा उत्तर प्रदेशात घडणार आहे.

‘सैराट’ म्हणजे उत्कट प्रेमाची गोष्ट सांगणारी आणि त्याचबरोबर समाजातील भीषण जात वास्तव अधोरेखित करणारी अद्धभूत कलाकृती आहे. या चित्रपटातून मांडलेलं वास्तव आणि त्यातील संदेश प्रत्येकापर्यंत पोहचावा यासाठी आम्ही सैराटवर आधारित मालिका बनवण्याचं ठरवलं आहे, असं अ‌ँड टीव्हीचे विष्णू शंकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ‘सैराट’ सिनेमा 2016 साली संपूर्ण महाराष्ट्राभर गाजला होता. या चित्रपटाने 100 कोटींचा पल्ला पार करणारा मराठी चित्रपटसृष्टीतला पहिला सिनेमा बनला आहे.

महत्वाच्या बातम्या

-स्वतंत्र भारतातला पहिला दहशतवादी हिंदू, त्याचं नाव नथुराम गोडसे- कमल हसन

-“…तर मोदी दिल्लीतील विजय चौकात स्वत:ला फाशी लावून घेणार का?”

-पश्चिम बंगालमध्ये आरएसएसचे कार्यकर्ते सुरक्षा दलांच्या गणवेशात; ममता बॅनर्जींचा आरोप

-पुढील आयपीएलमध्ये खेळणार का?; धोनीचं मोठ वक्तव्य…

-तुम्ही आंतरराष्ट्रीय मीडिया विकत घेऊ शकत नाही; रिचा चड्ढाचा मोदींना टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या