बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सलग 4 दिवसांच्या दरवाढीनंतर आता इंधन दरवाढीला ब्रेक; पाहा आजचे दर

मुंबई | इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य माणुस मेताकूटीला आला असताना गेल्या 4 दिवसांच्या इंधन दरवाढीनंतर आता आज पेट्रोलियम कंपन्यांनी अखेर दरवाढीला ब्रेक मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासादायक वातावरण निर्माण झालं आहे. महागाईने सध्या रौद्ररूप प्राप्त केलं असताना सर्वसामान्यांच्या मात्र खिशाला कात्री लागली आहे.

आज पेट्रोल आणि डिझेल दोन्हीचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने इंधनाचे दर देखील गगणाला भिडले आहेत. आज मुंबईतील पेट्रोलचा दर हा 107.95 रूपये प्रति लिटर असून डिझेलचा दर हा 97.84 रूपये प्रति लिटर एवढा आहे. त्यामुळे काल झालेल्या दरवाढीनंतर आज तुर्तास दरवाढीला ब्रेक लावण्यात आला आहे.

जागतिक बाजारात ब्रेंट क्रुड ऑईलचा भाव हा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे. त्याचाच परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर होताना पाहायला मिळत आहे. सरकारने आता लावलेले कर कमी करून इंधन दरवाढीला थांबवावं अशी संतप्त प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार युरोपमध्ये तेलाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच पुरवठाही मर्यादित स्वरूपात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात इंधन दरवाढ आणखी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय होणार? हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, जशास तसं उत्तर द्या- मनोहरलाल खट्टर

पगार थकवला म्हणुन मालकाच्या गाडीला लावली आग; चिंचवडमधील धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद

“हा मोदींचा नवीन भारत आहे, इथे गुन्हेगारांना दंड दिला जातो मग तुमचा बाप कोणीही असो”

आर्यन खानने ‘या’ ठिकाणी लपवले होते ड्रग्ज; धक्कादायक माहिती समोर

‘या’ कारणामुळे प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, काय आहे प्रकरण?

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More