बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता कोरोनाचा पूर्ण नायनाट होणार?; शास्त्रज्ञांनी विकसित केली अँटी व्हायरल थेरपी

नवी दिल्ली | सध्या सर्वत्र कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता दिवसेंदिवस लोकांच्या मनात विविध आजारांविषयी भीती तयार होऊ लागली आहे. त्यात आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी आता एक नवीन विषाणू विरोधी थेरपी विकसित केली आहे. त्यामुळे आता महाभयंकर कोरोना विषाणूला आळा घातला येणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच्या वैज्ञानिकांकडून एक नवी अँटी व्हायरल थेरपी तयार करण्यात आली आहे. या नव्या अँटी व्हायरल थेरपीद्वारे फुफ्फुसांमधील कोरोना विषाणूंचा शोध घेऊन ते नष्ट केले जातात. नव्या अँटी व्हायरल थेरपीमुळे कोरोनाचा 99.9 टक्के नायनाट करण्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता कोरोनाचा प्रसार आणि रूग्णांच्या उपचारात या थेरपीचा वापर करता येणार आहे. त्यामुळे लवकरच जगभरात दिलासादायक चित्र पहायला मिळू शकतं.

ऑस्ट्रेलियाच्या ग्रिफिथ विद्यापीठ या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या वैज्ञानिकांच्या पथकाने ही अँटी व्हायरल थेरपी यशस्वीरित्या तयार केली आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोना रूग्णांना दिली जाणारी ओषधं फक्त विषाणूची लक्षणं घटविण्यास मदत करत आहेत. त्यामुळे हा रोग पुन्हा नव्यानं उद्भवण्याची शक्यता असते. परंतू या थेरपीमुळे खूप काळ परिणाम दाखवला जाऊ शकतो, असं तज्ज्ञांच म्हणणं आहे.

दरम्यान, या अँटी व्हायरल थेरपीद्वारे विषाणूच्या जीनोमवर थेट हल्ला केला जातो. त्यासाठी जीनोम सायलेंसिंग एसई आरएनए तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. एसई आरएनएच्या माध्यमातून विषाणूला पुन्हा बनण्यापासून रोखलं जातं. त्यामुळे आता कोरोना प्रतिबंधासाठी हा एक कायमचा इलाज ठरू शकेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

मी पुराव्यांसह सांगतोय, कोरोनामुळे झालेल्या मृत्युसाठी मोदीच जबाबदार- असदुद्दीन ओवैसी

‘तुझ्या बापाला’ म्हणत किशोरी पेडणेकरांचं नेटकऱ्याला रोखठोक उत्तर!

आज महाराष्ट्रात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

‘या’ राज्याने 12 वीच्या बोर्डाची परीक्षा केली रद्द; विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची- मुख्यमंत्री

दोन चित्रपटांनंतर आणखी एका चित्रपटातून कार्तिक आर्यन बाहेर; मेकर्सनं केला खुलासा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More