बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाह!!! आता कोरोनाला मास्कच मारणार; पुण्यातील कंपनीने बनवला ‘हा’ जबरदस्त मास्क

पुणे | कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात अनेकांचे प्राण गेले आहेत. कोरोना विरूद्धच्या लढ्यात अनेकांनी नवनवीन प्रयोग केले. इंजिनिअर्स आणि स्टार्टअप कंपन्यांनी अनोखे प्रयोग करत आरोग्य विभागाची मोठी मदत केली आहे. कोरोना असल्यानं सर्वांना बचावासाठी मास्क घालण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यानंतर देखील काही जणांना कोरोनाची लागण झाली. पण आता कोरोनाला मास्कच मारणार असल्यानं सर्वांची चिंता दूर होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील थिंकर टेक्नॉलॉजिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअप कंपनीनं एक अनोखा मास्क बनवला आहे. हा मास्क घातल्यानंतर कोरोना होण्याची शक्यता नाही, असा दावा या कंपनीनं केला आहे. या मास्कच्या संपर्कात येताच कोरोना विषाणू निष्क्रीय होऊन जाईल. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी हा मास्क खूपच महत्वाचा ठरु शकतो, असंही कंपनीनं म्हटलं आहे. या मास्कची चर्चा आता सर्वत्र चालू झाली आहे.

थ्रीडी-प्रिंटिंग आणि औषधांच्या मिश्रणातून एक असा मास्क तयार केला आहे. जो आपल्या संपर्कात येणाऱ्या व्हायरल विषाणू म्हणजेच विषाणूंना निष्क्रीय करुन टाकतो. तयार केलेल्या मास्कवर विशिष्ट प्रकारे औषधाचा लेप लावण्यात येतो. त्यामुळे विषाणू मास्कवरच नष्ट होतात, असं कंपनीनं म्हटलं आहे. विज्ञान आणि प्रौद्योगिक विभागाने या मास्कची दखल घेतली आहे.

दरम्यान, या लेपमध्ये सोडियम ओलेफिन सल्फोनेटचं मिश्रण वापरण्यात आलं आहे. याचा वापर साबणामध्ये केला जातो. विषाणू या लेपच्या संपर्कात आल्यानंतर कोरोना विषाणू नष्ट होऊन जातात. सध्याचे मास्क कमी गुणवत्तेचे आहे, या मास्कवर आणखी प्रयोग करण्यात येत असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

अबब! फक्त एका ट्विटमुळे उद्योगपती गौतम अदानी यांना एका दिवसात 1.03 लाख कोटींचा फटका

कधीकाळी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या ‘या’ अभिनेत्याकडे सध्या घर खर्च भागवण्यासाठीही पैसे नाहीत!

मोठा निर्णय! एसईबीसी प्रवर्गातील जागा आता खुल्या प्रवर्गातून भरणार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार असलेला डेल्टा व्हेरीएंट आता डेल्टा प्लसमध्ये बदलला, भारताला धोका किती?

विजय वडेट्टीवार मुख्यमंत्र्यांवर नाराज? भर पत्रकार परिषदेत व्यक्त केली नाराजी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More