बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ख्रिस्तियानो रोनाल्डो आता होणार 6 मुलांचा बाबा, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली बातमी

नवी दिल्ली | पोर्तुगालचा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने नुकतीच इन्स्टाग्रामवरून त्याच्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो आता पुन्हा एकदा बाबा होणार आहे. शिवाय तो एकाच वेळी दोन मुलांचा बाबा होणार आहे. ख्रिस्तियानो आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया हीने नुकतेच काही फोटो शेअर करत ही बातमी दिली आहे.

ख्रिस्तियानोने जॉर्जियासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत ही माहिती दिली आहे. त्याने फोटोखालील कॅप्शनमध्ये म्हटलं आहे,”आम्हाला सांगताना अतिशय आनंद होत आहे की, आम्हाला जुळी मुलं होणार आहेत. त्यांना भेटण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.” असं सांगत त्याने आनंद व्यक्त केला आहे. यावेळी त्याने त्याचा मुलांसोबतचा फोटोही शेअर केला आहे.

ख्रिस्तियानो आणि जॉर्जिया यांना अगोदर 4 मुलं आहेत. ख्रिस्तियानो ज्युनियर हा रोनाल्डोचा सर्वात मोठा मुलगा असून तो 11 वर्षााचा आहे. त्यानंतर त्याला इव्हा आणि मटाओ ही जुळी मुलं आहेत. त्यानंतर त्याच्या सर्वात छोट्या मुलीचं नाव अलाट मर्टीन आहे. जी 3 वर्षाची आहे. आता रोनाल्डो पुन्हा एकदा बाबा झाल्यानंतर तो 6 मुलांचा बाबा होणार आहे.

ख्रिस्तियानो हा फुटबॉलमधील स्टार खेळाडू तर आहेच शिवाय तो सोशल मीडियावरही अतिशय प्रसिद्ध आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर 360 मिलीयन फॉलोवर्स असून तो 300 मिलीयनचा टप्पा गाठणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो पोर्तुगालच्या टीमसाठी सर्वाधिक करणारा खेळाडू आहे. त्याने 5 वेळा बॅलन डिओर अवार्ड आपल्या नावावर करून घेतला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano)

 

थोडक्यात बातम्या-

मुलाच्या सुटकेनंतर शाहरुखचा पहिला फोटो आला समोर

सोशल कनेक्शनच्या नव्या पर्वाला सुरूवात! फेसबुकचं नाव बदललं

“शिवसेनेचं हिंदुत्व नितेश राणेंच्या जन्माच्या अगोदरपासून, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही”

“मला कधी कधी वाटतं मोदी आणि गडकरी यांच्यात स्पर्धा सुरू आहे”

‘…म्हणजे निश्चितच काहीतरी काळंबेर आहे’; नवाब मलिक आक्रमक

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More