बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अब देवेंद्र अकेले ही नहीं, सारी कायनात उनके साथ है’- अमृता फडणवीस

मुंबई | राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपने सहाव्या जागेवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये रंगतदार लढत झाली. राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपकडून मोठा जल्लोष करण्यात आला. भाजपच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच कौतुक केलं आहे. त्यातच आता अमृता फडणवीसांनी राज्यसभा निवडणुकीच्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेला धडे सुरू होणार आहेत, असा इशारा अमृता फडणवीसांनी दिला आहे.

राज्यसभेच्या विजयाचा मला खुपच आनंद आहे. देवेंद्र कभी अकेला नहीं था, उनके साथ पुरी कायनात है. आपण सर्वजण देखील आहात. मला वाटते की, जे विकासाचे राजकारण आहे ते पुढे जाईल, असं अमृता फडणवीसांनी म्हटलं आहे. तसेच ज्याप्रकारे त्यांनी स्वत:ला झोकायला पाहिजे होतं. त्याप्रकारे त्यांनी काम केलं नाही. फक्त टोमणेबाजीचं राजकारण केलं. टोमणेबाजीचे राजकारण पुढे येणार नाही, असा टोला अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

शिवसेनेला हा धडा नाही. धडे आता सुरू होणार आहेत. उद्धव ठाकरे जेव्हा सीएम झाले तेव्हा मी अगोदरच बोलले होते. आता जो राजा आहे तो आपल्या प्रजेसाठी किती ठीक आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. त्यावेळेस कोणी बोलत नव्हतं. आता प्रत्येक माणूस बोलत असल्यामुळे मला बोलण्याची गरज नाही, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

दरम्यान, भाजपकडून केंद्रीय मंत्री पियुष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली होती. शिवसेनेचे संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यामध्ये अटीतटीची लढत होती. महाविकास आघाडीकडून चौथा उमेदवार यशस्वी करण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. मात्र, राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपने बाजी मारली आहे. त्यावरून अमृता फडणवीसांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत शिवसेनेले लक्ष्य केलं.

थोडक्यात बातम्या- 

वडिल धनंजय महाडिकांच्या विजयानंतर लेकाला अश्रू अनावर, सर्वांसमोर बाबांना मारली कडाडून मिठी

किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारला सूचक इशारा, म्हणाले…

‘…तर एक हजार कोटी देईन’; नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चेत

Rajyasabha Election Result | राज्यसभेचा निकाल वाचा एका क्लिकवर

“शरद पवारांमध्ये बिघडवण्याचं आणि जागेवर पलटी मारायचं टॅलेंट आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More