बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता घरच्या घरी कोरोना चाचणी करता येणार; जाणून घ्या ICMRचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई | आयसीएमआरने रॅपिड अँटिजन टेस्टसाठी एका किटला मंजुरी दिली आहे. किटचे नाव कोविसेल्फ असं आहे. या किट संदर्भात आयसीएमआरने काही मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. पुण्यातील माय लॅब कंपनीनं घरच्या घरी कोरोना चाचणी करण्याचं किट तयार केलं होतं. त्यानंतर आता त्याला आयसीएमआरने मंजुरी दिली आहे.

फक्त लक्षणं असलेल्या नागरिकांना याद्वारे घरीच चाचणी करता येईल. तसंच असे नागरिक जे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आले आहेत, त्यांनाही घरून चाचणी करता येणार आहे. ही चाचणी कंपनीने दिलेल्या नियमांनुसारच करावी लागणार आहे. त्यासाठी सर्वात आधी घरीच करोना चाचणी करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअरवरून मोबाइल अॅप डाउनलोड करावं लागेल.

घरीच चाचणी करणाऱ्यांना टेस्ट स्ट्रीपचा फोटो काढावा लागणार आहे आणि ज्या फोनवर होम टेस्टिंग मोबाईल अॅप डाउनलोड केलेला आहे. त्याच फोनवर फोटो हा टाकवा लागणार आहे. तुम्ही टाकलेला डेटा हा थेट आयसीएमआरच्या टेस्टींग पोर्टल स्टोअरवर जाणार आहे. त्या डेटा बद्दल गोपनियता ठेवण्यात येईल असं आश्वासन देखील देण्यात आलं आहे. यासंदर्भात आयसीएमआर आणखी विस्तृत माहिती देणार आहे. या संदर्भात आयसीएमआरने एक लिंक देखील शेअर केली आहे. www.icmr.gov.in/chromecare.html. अशी ही लिंक आहे.

दरम्यान, या तंत्रज्ञानामुळे कोरोना रिपोर्ट लवकर मिळणार आहे. यात जे नागरिक पॉझिटिव्ह आढळतील त्यांना होम आयसोलेशनबाबत आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावं लागेल. यातही जर लक्षणं असूनही त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल त्यांना मात्र RTPCR टेस्ट करावी लागेल.

थोडक्यात बातम्या-

रिक्षाचालकांसाठी खूशखबर; कागदपत्रांशिवाय असे मिळणार दीड हजार रुपये

आनंदाची बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त

‘कोरोना लसीमुळे माझा 10 वर्षांपासूनचा आजार नाहीसा झाला’; शिक्षकाचा दावा

चक्रीवादळामुळं उन्मळून पडलेल्या झाडासमोर अभिनेत्रीचा डान्स; नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं

कोरोनाबद्दल खळबळजनक ट्विट करणाऱ्या डॅाक्टरचा कोरोनानेच घेतला जीव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More