Top News महाराष्ट्र मुंबई

आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकासआघाडी सरकारला स्वीकारलं आहे- शरद पवार

मुंबई | विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. पुणे पदवीधर संघात भाजपने गेली 20 वर्षे आपला गड राखला होता. मात्र यंदा भाजपला गमवावा लागला आहे. एकंदरित सर्व निकाल पाहता महाविकास आघाडीने एकत्र लढल्यामुळे भाजपला रोखलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपने मिळवलेला धुळे-नंदुरबारचा विजय आश्चर्यकारक नव्हता. त्यांच्या हाती मोठा वर्ग पूर्वीपासून होता. त्याचा विजय नव्हे, तो खरा विजय नाही. नागरपूची जागा कधीच मिळाली नव्हती. ती कॉग्रेसने जिंकली. महाराष्ट्रातील हा निकाल महाविकासआघाडीचा विजय असल्याचं शरद पवार म्हणाले.

आम्हाला पुणे मतदारसंघात यश मिळवता आलं नव्हतं. महाविकास आघाडीने एकत्र येऊन सरकारने कामं केलीत हे त्याचं यश आहे. आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकासआघाडी सरकारला स्वीकारलं आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आजपर्यंत ज्यांना स्वीकारलं त्यापेक्षा वेगळा निकाल आला आहे. महाराष्ट्रतील चित्र बदललं असल्याचंही पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

‘आत्महत्या करणारे शेतकरी भेकड’; कर्नाटकच्या कृषीमंत्र्यांचं संतापजनक वक्तव्य

“…हे मुख्यमंत्र्यांचं कौतुक की अब्रू काढणं हे अजित पवार सांगू शकतात”

‘हिंमत असेल तर एकएकटे लढा’; पाटलांचं सत्ताधाऱ्यांना आव्हान

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा डंका, सतीश चव्हाणांची हॅट्रीक

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपला धक्का; महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या