नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. असं असलं तरी तिसऱ्या संभाव्य लाटेविषयी तज्ज्ञांकडून शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सजग राहणं गरजेचं आहे, असं सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहे. कोरोना संकटापासून वाचण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात असून सगळ्यांनी लसीकरण करणं गरजेचं आहे. अशातच आता विदेशी नागरिक भारतात लस घेऊ शकतात का? याविषयी केंद्रानं आता महत्वाची माहिती दिली आहे.
सध्या तिसरी लाटही येणार असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात असल्यानं कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. यातच आता भारतात राहणाऱ्या विदेशी नागरिकांचंही कोरोना लसीकरण करणार असल्याची परवानगी केंद्र सरकारकडून मिळाली आहे. त्यामुळे आता परदेशातले नागरिकही भारतात लस घेऊ शकतात.
कोरोना संसर्ग वाढण्याची भिती असल्यानं लसीकरण होणं गरजेचं आहे. भारतात लस घेण्यासाठी विदेशी नागरिकांना आता कोवीन अॅपद्वारे लसीकरण करता येणार आहे. कोवीन अॅपवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आधार क्रमांक गरजेचा होता. मात्र आता विदेशी नागरिकांना पासपोर्टद्वारे लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे.
दरम्यान, लसीचा दुसरा डोस मिळाल्यानंतर मिळणारे क्युआरकोड प्रमाणपत्र आगामी काळात मॉल, रेस्टॉरेंट, जीममध्ये ग्राह्य मानले जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणाबाबत गैरसमज न ठेवता लवकर लसीकरण करून घ्यावे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
थोडक्यात बातम्या –
रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, तिकीट निश्चिती आरक्षणाचे नियम बदलले
UPSC उमेदवारांची चिंता वाढली; दोन परीक्षा एकाच दिवशी आल्यानं उमेदवारांमध्ये संभ्रम
नवरा-नवरीचे फोटो काढण्यात धुंद असलेल्या फोटोग्राफरची ‘अशी’ झाली फजिती, पाहा व्हिडीओ!
व्हाॅट्सअॅपचं नवं फिचर; लवकरच ‘या’ नव्या इमोजींचा होणार समावेश
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत होणार ‘या’ मास्कचा उपयोग; संशोधकांचं अनोखं तंत्रज्ञान
Comments are closed.