Top News नागपूर महाराष्ट्र राजकारण

शिवजयंतीवर बंधनं घालायला ही काय मोगलाई आहे काय?- देवेंद्र फडणवीस

नागपूर | कोरोनाच्या काळात जनतेच्या पाठिशी उभं राहायचं सोडून या सरकारने 75 लाख लोकांचं वीज कनेक्शन कापण्यासाठी नोटीसा बाजवल्या. आता तर शिवजयंतीवर बंधनही घातली गेली. ही मोगलाई आहे काय?, असा संतप्त सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

राजकीय पक्षांचे मोठमोठे कार्यक्रम होत आहेत. मात्र शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 144 कलम लावलं जातं. लोकं सर्व काळजी घेऊन शिवजयंती साजरी करत असतात. आजही नियमांचे पालन करून शिवजयंती साजरी करु मात्र शिवजयंतीवर बंधनही घातली गेली, असं फडणवीस म्हणाले.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवशेन येत्या 1 मार्चपासून सुरू होत आहे. यावर बोलताना आगामी अधिवेशनात वीज कनेक्शनसह अनेक मुद्दे आमच्याकडे आहेत. या मुद्द्यांवर सरकारला घेरलं जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं आहे.

जर या सरकारने अधिवेशनाचा कालावधी कमी केला तर सरकार प्रश्नांपासून पळ काढत आहे, असा त्याचा अर्थ होईल. तसेच अधिवशेन किमान चार आठवड्यांचं असावं, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या

पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

“आराेप सिद्ध हाेईपर्यंत संजय राठाेड यांच्यावर कारवाई नको”

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना दिलासा!

होम क्‍वारंटाइन रुग्णांच्या हातावर पुन्हा शिक्का, घराबाहेर पडल्यास होणार ‘ही’ कारवाई

“काँग्रेसनं संविधान सांभाळलं म्हणून चहावाला देशाचा पंतप्रधान झाला”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या