मुंबई | मार्चपासून महाराष्ट्र राज्यात कोरोना संसर्ग रोगाचा फैलाव सगळीकडे पसरला होता. या काळात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड आजारावरील उपचारासाठी केलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे. याविषयीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
कोरोना काळात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱयांना कोविडची लागण झाली. त्याच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च आला. काहींना स्वतःचे प्राणसुद्धा गमवावे लागले. याबाबत शिक्षक संघटनांनी वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या यादीत कोविड-19 चा समावेश करण्याबाबत मागणी केली होती.
शिक्षक संघटनांच्या याच मागणीला लक्षात घेत आरोग्य विभागाने शासन निर्णय जारी करून वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या यादीत कोविड-19 चा समावेश करण्याचे जाहीर केले.
दरम्यान, दरम्यान, मार्च 2020 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली.
थोडक्यात बातम्या-
क्रूरतेचा कळस! रात्रीच्या अंधारात बैलाला गळफास देऊन बैलाची केली हत्या
“पुत्र मोह सोडा, लोकशाहीला वाचवा शिवानंद तिवारी”
“अजित पवारांना जे काही मिळालंय ते शरद पवारांमुळे त्यावर त्यांनी स्वत:च लेबल लावू नये”
“नेपाळमधील हिंदुत्व संपवलं जात असताना भारताने काय केलं?”
“तेव्हा ढसाढसा रडणारे अजित पवार आता मोठा टग्या असल्याचा आव आणत आहेत”