बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आता माझ्याजवळ अजितदादा नावाचं सुप्रीम कोर्ट आहे”

पुणे | बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे सोमेश्वर सहकारी कारखान्याचा शनिवारी गाळप हंगामाचा शुभारंभ पार पडला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर कृती समितीचे प्रमुख सतीष काकडे यांनी अजित दादांचचं नाव घेत नविन संचालक मंडळाला इशारा दिला आहे. माझ्याजवळ अजित दादा नावाचं सुप्रीम कोर्ट आहे, असं वक्तव्य सतीश काकडे यांनी केलं आहे.

मी जोपर्यंत आहे तोवर कृती समिती अजित पवार यांच्याचं पाठीशी उभा राहिल, असं सतीश काकडे यांनी म्हटलं आहे. मला जर सोमेश्वर कारखान्याचं कामकाज पटलं नाही तर मी हायकोर्टात जायचो. मात्र आता माझ्याजवळ अजित दादा नावाचं सुप्रीम कोर्ट आहे, असं सतीष काकडे म्हणाले आहेत.

माझ्या मुलाला जरी संचालक मंडळात घेतलं असलं तरी काही अडचणी सांगायला मला अजित दादा नावाचं सुप्रीम कोर्ट आहे, असंही सतीष काकडे यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी सतीश काकडे यांनी अजित पवार यांच्या कामाचं कौतुक देखील केलं आहे.

दरम्यान, ऊसाला आता एकरकमी एफआरपी द्यावा असं आवाहनचं सतीश काकडे यांनी केलं आहे. सोमेश्वर कारखान्याकडून ऊसाला प्रतिटन 3100 भाव दिला आहे. विकासकामांच्या मुद्यावर मी कायम अजित पवार यांच्यासोबत आहे, असंही सतीष काकडे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…तर आता जम्मू काश्मीरमध्ये स्वस्थ बसून चालणार नाही’; मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

‘वर्क फाॅम होम’ करताय? तर ‘ही’ गोष्ट केलीच पाहिजे

“साहेब! जो बुंद से गयी वो हौद से नहीं आती”

मोठी बातमी! मनमोहन सिंग यांना डेंग्यूची लागण, प्रकृतीबाबत आली ‘ही’ माहिती समोर

“आम्ही छापा टाकून काटा काढत नाही, काटा काढून छापा टाकतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More