बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कमांडो ऑपरेशन राबवून POK ताब्यात घ्यायची हीच वेळ आहे- अविनाश धर्माधिकारी

पुणे |  जगभरासह देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाने हजारो जणांचे प्राण घेतले आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण जगभरातील आरोग्य यंत्रणा नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी दिवस रात्र डोळ्यात तेल घालून काम करत आहे. मात्र कमांडो ऑपरेशन राबवून POK ताब्यात घेण्याची सध्याची हीच ती वेळ आहे, असं सुप्रसिद्ध व्याख्याते आणि माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी म्हटलेलं आहे. (Now is the time to take POK by executing a commando operation says Avinash Dharmadhikari)

अविनाश धर्माधिकारी यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. आता अशी परिस्थिती आहे की आपण कमांडो ऑपरेशन राबवून POK ताब्यात घ्यायला हवा, अशी अजब पोस्ट त्यांनी लिहिली आहे. संपूर्ण जगात कोरोनाने युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली आहे आणि एका सनदी अधिकाऱ्याने अशी विचित्र मागणी करणारी फेसबूक पोस्ट लिहिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Now is the time to take POK by executing a commando operation says Avinash Dharmadhikari)

सध्या देशात आणि महाराष्टात कोरोनामुळे विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्र शासन, राज्य शासन तसंच संपूर्ण आरोग्य यंत्रणा जीवाचं रान करून नागरिकांची सेवा करत आहे. पंतप्रधान मोदींनी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर पावलं उचलली आहेत. सगळं जगच संकटात सापडल्याचं चित्र असताना धर्माधिकारी यांची मागणी मनाला न पटणारी असल्याचं त्यांच्या पोस्टखाली अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे तो काही कमी होण्याचा नाव घेताना दिसत नाहीये. आज काही तासांत कोरानाबाधितांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आता हा आकडा 97 वर पोहचला आहे. साताऱ्यामध्ये 1 कोरोनाग्रस्त, सांगलीमध्ये कोरोनाचे  4 रूग्ण तर मुंबईत 3 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अधिकाधिक काळजी घेण्याचं आवाहन प्रशासन वारंवार करत आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

शरद पवार कोरोनाला हरवण्यासाठी घरात बसून पुस्तक वाचत आहेत, तुम्हीही घरीच थांबा…!!!

मला पोलीस सुरक्षा नको; आताच्या परिस्थितीत जास्त गरज महाराष्ट्राला- विनोद तावडे

महत्वाच्या बातम्या-

शिवभोजन थाळी पार्सल करून गोरगरीब जनतेला द्या; राष्ट्रवादीच्या आमदाराची मागणी

सावधान… कोरोनाग्रस्तांची संख्या पोहचली 97 वर; नागरिकांनो आता तरी घराबाहेर पडू नका

“आता रस्त्यांवर फिरणाऱ्यांची गय करणार नाही… सगळं तुमच्यासाठीच चाललंय एवढंही कळू नये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More