बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चला उठा शेतकरी बांधवांनो… आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीय”

पुणे | बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा विषय आहे. मात्र 2017 पासून या शर्यतीवर बंदी आली आहे. बैलगाडा शर्यतीवर बंदी असली तरी बैलगाडा प्रेमींचं आणि शेतकऱ्यांचं बैलांवरील प्रेम कमी झालं नसल्याचं राज्यात नेहमी आपल्याला पाहायला मिळतंय. अशातच आता शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी याच मुद्द्यावरुन शेतकऱ्यांना साद घातली आहे.

गेल्या सात वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवर न्यायालयाने बंदी घातली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात अनेक संघटना आंदोलन करत आहेत. बैलगाडा शर्यत सुरु होण्यासाठी अनेक संघटना प्रयत्नशील आहेत. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याची मागणी अनेक संघटनांनी तसेच अनेक पक्ष करताना दिसतात, मात्र या मागणीला अद्याप यश आलेलं नाही.

बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी अनेक ठिकाणी आंदोलनं देखील करण्यात आली आहेत. आता बैलगाडा शर्यतीसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

1969 साली प्रदर्शित झालेल्या एका मराठी चित्रपटात दाखवलेली बैलगाडा शर्यत, बैलांबरोबर शेतकरी, वाजंत्रीवाले आनंदाने धावत आहेत… हे क्षण बघून अंगावर अक्षरशः शहारे येतात. वाजंत्रीवाले देखील देहभान विसरून वाद्य वाजवतात, मनसोक्त नाचतात हे सगळे क्षण आता दुर्मिळ झालेत. चला उठा शेतकरी बांधवांनो प्रखर संघर्षाला तयार व्हा, रस्त्यावर उतरायची वेळ आता आली आहे, असं आढळरावांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

दुसरीकडे आढळराव पाटील यांचे विरोधक आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॅा. अमोल कोल्हे यांनी बैलगाडे सुरु करण्याच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली होती, मात्र त्यांना अद्याप हा विषय सोडवण्यास यश आलेलं नाही. आता आढळराव यांनी हा मुद्दा हातात घेतल्याने अमोल कोल्हे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

https://fb.watch/7nbIWRXGGl/

थोडक्यात बातम्या-

11वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरू, वाचा सविस्तर

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी राजकारणातलं प्यादं बनू नये”

“मला मुलंही आवडतात पण मी मुलीसोबतही लग्न करु शकते”

बाहेरून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; सरकारने घेतला मोठा निर्णय

रानडे इंस्टिट्यूटच्या स्थलांतराला अखेर स्थगिती; विद्यार्थ्यांच्या मागणीला मोठं यश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More