देश

गाड्यांवर जातिसूचक स्टिकर लावणं महागात पडणार!

लखनऊ | उत्तर प्रदेशात अनेक लोक आपल्या गाड्यांच्या नेमप्लेटवर जाट, यादव, गुर्जर, क्षत्रिय, राजपूत, पंडित, मौर्य अशी जातिसूचक नावं लिहिलेलं पाहायला मिळतं. पण आता असं करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

गाड्यांवर स्टिकरच्या माध्यमातून आपल्या जाती दर्शवणं आता महाग पडणार आहे. यूपी सरकार आता जातिसूचक स्टिकर लावणाऱ्यांच्या, गाड्या सीज करून कारवाई करणार आहे.

याप्रकरणी उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यातील परिवहन अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. हे आदेश केंद्रीय परिवहन विभागाच्या निर्देशांनंतर देण्यात आले आहेत.

गाड्यांवर जातिसूचक स्टिकर लावण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात असल्याच्या अनेक तक्रारी सातत्याने केंद्र सरकारकडे येत होत्या. यानंतर पंतप्रधान कार्यालयाने यूपी सरकारला पत्र लिहून, या प्रथेवर बंदी घालण्यासाठीचे निर्देश दिलेत. त्यानंतर योगी सरकाने राज्यातील सर्व जिल्ह्यातील परिवहन अधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“भाजपची ईडी आता सनम बेवफा झाली आहे; तिकडे फिरकलीच नाही”

मी त्यांना सांगितलं होतं, मात्र माझं कोणी ऐकलंच नाही- रोहित पवार

“तुम्ही चार द्या, पण दोन घ्यायची तयारी ठेवायलाच हवी”

…चांगलं काम केलं तर नोटीस मिळत नाही- देवेंद्र फडणवीस

“ईडीला आता कुणी घाबरत नाही, शरद पवार आणि ठाकरेंना नोटीस आली पुढे काय झालं?”

‘इंग्रजी विक म्हणजे….’; मराठी मुलांना अभिनेता स्वप्नील जोशीने दिला हा मोलाचा सल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या