बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आता लोकांनी घरातही मास्क घालण्याची वेळ आली आहे”

नवी दिल्ली | देशभरात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: थैमान घातलं आहे. त्यातच आरोग्य यंत्रणाही अपुरी पडत असल्याचं भयावह चित्र गेल्या काही दिवसांपासून पहायला मिळत आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर केंद्र सरकारने एक मोठं वक्तव्य केलं आहे.

कोरोनाची दुसरी लाट ही अत्यंत भयंकर असल्यामुळे आता घरातही मास्क लावण्याची वेळ आता आली आहे, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. त्याबरोबरच नागरिकांना केंद्र सरकारतर्फे सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. सध्या देशात तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण दरदिवशी आढळत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

देशभरात ऑक्सिजनची कमतरता आणि रेमडेसिविर इंजेक्शनची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यातच रेमडेसिविर हे इंजेक्शन संपूर्णपणे कोरोनावर मात करण्यासाठी उपयुक्तच आहे, असं नाही. त्यामुळे या इंजेक्शनचा साठा करून काळाबाजार करू नये, तसेच कोरोनाची सौम्य लक्षण असलेल्यांना सपोर्ट ट्रीटमेंटनेही बरं करता येऊ शकतं, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे नागरिकांना आवाहन करताना म्हटलं आहे की, देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.  अशा वेळी नागरिकांनी आणि कोरोनाबाधित रुग्णांनी पोटावर झोपून श्वसनाचा व्यायाम करावा. कोरोना हा आजार व्यवस्थित काळजी घेतल्यास आणि वैद्यकीय उपचार मिळाल्यास लवकरच बरा होतो, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनाचा सामना करण्यासाठी तयार राहावं, असं आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या –

रक्ताच्या नात्यानेच फिरवली पाठ! आईला कोरोना झाल्यामुळे मुलाने…

धक्कादायक! पत्नीचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याने पतीने केलं माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य

मोफत लसीकरणाने महाराष्ट्राच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा

परदेशी खेळाडूला पहावले नाहीत भारतीयांचे हाल, ॲाक्सिजनच्या पूर्ततेसाठी 37 लाखांची मदत

कोरोनामुळे कलाकारांवरही वाईट वेळ, तारक मेहता फेम नट्टू काकांची परिस्थिती गंभीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More