“आता मोदी चहा विकणार आणि अमित शहा वडे विकणार”

नाशिक | एमआयएम चे आमदार इम्तियाज जलील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दोन कोटी नोकऱ्या देणाऱ्या भाजपने किती नोकऱ्या दिल्या, असा प्रश्न इम्तियाज यांनी यावेळी केला.

एमआयएमचं सरकार आल्यानंतर दोन लोक बेरोजगार होणार आहेत. त्यांना काम देण्यासाठी मी प्रकाश आंबडेकरांना सांगणार आहे. 

नाशिकच्या स्टेशनवर नरेंद्र मोदी मित्रो चहा.. चहा करतांना मोदी दिसेल आणि वडा विकतांना अमित शहा दिसेल, असं म्हणत त्यांनी मोदी आणि शहा यांची खिल्ली उडवली.

दरम्यान, या सभेला तृतीयपंथी दिशा पिंकी शेखचे भाषण झाले. शेख यांनी आपल्या भाषणात या वंचित आघाडीमुळे वंचितापेक्षा वंचित असलेल्या आम्हाला व्यासपीठ मिळाले आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-…अन् ‘स्वाभिमानी’चे नेते नारायण राणे भाजपच्या निवडणूक जाहिरनामा बैठकीला हजर!

-“राफेल घोटाळ्यामुळे 56 इंचाच्या छातीत धडकी भरली आहे”

-राजकारण्यांनी इतर क्षेत्रात हस्तक्षेप करु नये, साहित्य संमेलनात गडकरींचा सल्ला

-“ओबीसींना 10 टक्के आरक्षण वाढवून देऊन आरक्षणाची मर्यादा 75 टक्के करा”

-“राज्याच्या मंत्रीमंडळात एक तरी शेतकऱ्याचं पोरगं दिसतंय का”??