बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मलिकांनी घेतली मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट; मुंबई पोलीस दलात हालचालींना वेग

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसातील राजकीय वातावरण ड्रग्स प्रकरणावरून तापलेलं आहे. आर्यन खान ड्रग्स प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानेखेडे आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यातील प्रकरणाला आता वेगळेचं वळण लागलेलं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मलिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली आहे.

गृहमंत्री वळसे पाटील आणि मुख्यमंत्रांची मी भेट घेतली. त्यांच्यांशी मी एसआयटीच्या चौकशीबाबत चर्चा केली आहे. गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, या प्रकरणात बऱ्याच लोकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलीस विभाग त्याचा तपास करत आहे. तपास करून निश्चितपणे यामध्ये गुन्हा दाखल करून त्यावर कारवाई होईल, असंही मलिक म्हणाले.

मी दोन दिवस परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर असताना, ज्या काही घडामोडी या क्रुझ ड्रग्स केसमध्ये झालेल्या आहेत. एका पंचाने प्रतिज्ञापत्राच्या माध्यामातून जो सगळा प्रकार समोर आणलेला आहे, हे धक्कादायक आहे, मी जे आरोप करत होतो, त्यात कुठं तरी भर देणारा हा प्रकार आहे, असंही मलिक यांनी सांगितलं.

दरम्यान, आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर नवाब मलिक हे सातत्याने आरोप करत आहेत. त्यांनी समीर वानखेडे यांच्यासंबंधित जन्मदाखल्याचा फोटो आणि समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो शेअर केल्यामुळे या प्रकरणाला आता वेगळंचं वळण लागलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! महागाई भत्त्यासह ‘दिवाळी भेट’ही मिळणार

“त्यांना अटक करू नये, त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवावं”

“विराटने खेळभावनेने पराभव स्वीकारला, मला त्याचं कौतुक वाटतंय”

दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये खळबळ! ‘या’ दिग्गज खेळाडूला संघातून वगळलं

मोठी बातमी! ड्रग्स प्रकरणात पहिला जामीन मंजूर; आर्यन खानला सुट्टी नाहीच

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More