बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकला बरबाद करणं आमचं पहिलं लक्ष्य; ‘या’ कारणांमुळे इसिस खुरासान गटाने दिला इशारा

काबूल | तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी आतापर्यंत अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्यामुळे अफगाण नागरिकांना सध्या मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. अशातच आता आयएसआयएस खुरासान या संघटनेने पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे.

पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. त्यामुळे त्याचा धोका अफगाणिस्तानला भविष्यात होण्याची दाट शक्यता आहे. सध्या पाकिस्तानला बरबाद करणं हे आमचे पहिलं लक्ष्य असणार आहे, असं आयएसआयएस खुरासान ग्रुपने म्हटलं आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर सत्ता काबीज केल्यानंतर पाकिस्तानमधील काही दहशतवादी संघटना सक्रीय झाल्या. भारताविरुद्ध कारवाया करण्यास त्यांना बळ मिळेल, अशी कट्टरतावादी आणि अतिरेकी संघटनांना आशा होती. परंतु त्यांचा कट्टरतावाद आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

आयएसआयएस खुरासान ही एक अफगाणिस्तानमधील अतिरेकी संघटना आहे. ती तालिबानपेक्षाही जास्त कट्टर इस्लामी विचारधारेवर विश्वास ठेवणारी आहे.  तालिबान्यांनी अफगाणिस्थानमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर तेथे खऱ्या अर्थाने इस्लामी कायदा लागू होत नाही. यासाठी ती संघटना पाकिस्तानला जबाबदार ठरवत आहे. त्यामुळे अगोदर पाकिस्तानला बरबाद केले पाहिजे, अशी भूमिका या संघटनेेने घेतली आहे.

दरम्यान, अलिकडेच अफगाणिस्तानमधील एका शिय़ा मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. त्यामध्ये 100 पेक्षा अधिक जण मारले गेले. त्याआधी ही शिया मुस्लिम नागरिकांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची ताजी आकडेवारी

‘मरेल पण भाजप सोबत जाणार नाही’; प्रियंका गांधींचं भाजपवर शरसंधान

दिल्ली विद्यापीठाच्या आगामी दोन महाविद्यालयांना सावरकर आणि सुषमा स्वराज यांची नावं

शाब्बास पु्णेकर! पुण्यात आज एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्युची नोंद नाही

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More