पुणे महाराष्ट्र

‘आता जनता लवकरच तुम्हाला शॉक देईल’, चंद्रकांत पाटील यांचा नितीन राऊत यांना इशारा

मुंबई | राज्यातील वाढलेल्या वीजबिलांच्या मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना जनतेला शॉक द्यायची सवय आहे. मात्र जनता लवकरच तुम्हाला शॉक देईल. जनता सर्व काही बघत आहे, लक्षात ठेवा, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी नितीन राऊत यांना दिला आहे.

वीजबिलं वाढलेली नाहीत, तर लोकांचा तसा समज झालाय, असं राज्याचे ऊर्जामंत्री सांगत असल्याची बातमी वाचनात आली. हे वाचून महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी अत्यंत वाईट वाटलं. हे जोडून तोडून तयार झालेले तिघाडी सरकार संपूर्णपणे नागरिकांप्रती असलेली आपली जबाबदारी विसरले आहेत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणारे वसई विरार क्षेत्राचे आमदार आणि बहुजन विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना जे 5.5 लाख रुपये विजेचे बिल आले आहे ते भरण्यास त्यांनी नकार दिला. आश्चर्याची बाब म्हणजे हे बिल त्यांना बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालयाचे आले आहे. तसेच वसई विरार मधील नागरिकांना हितेंद्र ठाकूर यांनी आवाहन केलं आहे की कोणीही असं चुकीचं वीज बिल भरू नका, ऊर्जामंत्र्यानी हे वाचलं नाही का?, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी विचारलाय.

महत्वाच्या बातम्या- 

शरद पवार आमचे कुटुंबप्रमुख, प्रत्येकाला सूचना देण्याचा त्यांना अधिकार- जयंत पाटील

पार्थला फटकारल्यानंतर अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट

मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शैक्षणिक मंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय

शरद पवारांच्या कडवट टीकेवर पार्थ पवार यांची अतिशय सायलेंट प्रतिक्रिया…!

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात दीड हजारांहून जास्त रुग्ण आढळले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या