बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी पवार साहेबांवर प्रेम केलं, मी त्यांचा माणूस असं…”

मुंबई | मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपला डच्चू देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीची सरकार सत्तेत आणलं. महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांचा खूप मोठा वाटा होता. अशातच आता संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मी शरद पवार यांचा माणूस आहे, असा ठपका नेहमी माझ्यावर ठेवला जातो. मी शरद पवारांवर प्रेम केलं पण मी माझ्या शिवसेना पक्षाशी कधीही प्रातारणा केली नाही. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि तिसरी पिढी यांना हे माहितीये की मी कधीही माझ्या पक्षाशी प्रातारणा केली नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

आम्ही प्रखत हिंदूत्ववादी आहोत. तो आम्ही कधीही लपवला नाही. निवडणूक आली की काही खोमिनी तयार होतात. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुरस्कार केला आहे. भाजपचे हिंदूत्व हे आता राहिले नाही. आता भाजपचं फक्त निवडणुकीपुरतं हिंदूत्व आहे, अशी टीका देखील राऊतांनी यावेळी केली आहे. सामला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्ष कोणत्याही एका धर्माला लांगूलचालन करत होती. त्यावेळी हिंदूत्वाचे वारे वाहत होते. हिंदूत्वादी मतांचे विभाजन होऊ नये म्हणून आम्ही त्यावेळी एकत्र आलो होतो, असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“उत्पादन वाढवा मार्केट निर्माण करण्याची जबाबदारी माझी”, गडकरींचं शेतकऱ्यांना आवाहन

“हिंदुंची मंदीरं तोडली जाणार असतील तर आम्ही…”; भाजप आमदाराचा इशारा

महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारीबाबत ‘ही’ माहिती आली समोर, वाचा एका क्लिकवर

मुख्याध्यापकाचं निलंबन मागे घ्या; 521 विद्यार्थी आझाद मैदानावर काढणार मोर्चा

24 तासाच्या आत फासा पलटला, ‘तो’ ताज पुन्हा अंबानींच्या डोक्यावर!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More