“तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा राहिली नाही”
अहमदनगर | राज्य सरकारकडून किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विरोध दर्शविला आणि 14 फेब्रुवारीला प्राणांतिक उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, राळेगणसिध्दी येथील ग्रामसभेतील ठरावानं अण्णा हजारे यांनी उपोषण तीन महिने पुढे ढकलत असल्याचं सांगितलं आहे. यावेळी बोलतांना अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
तुम्ही जनतेचे सेवक आहात मालक नाही. त्यामुळे जनतेची परवानगी घेवूनच निर्णय घ्यायला पाहिजे. तुमच्या या निर्णयानं मी दु:खी झालो आहे. त्यामुळे मला तुमच्या राज्यामध्ये जगायची इच्छा राहिली नाही, असं सांगत अण्णा हजारे यांनी मनातील उदासिनता व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना अण्णांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रात दारू कमी आहे? बियर बारचे दुकाने आहेत ना? वाईन शॉपीचेही दुकाने आहेत. त्यात वाईन मिळते ना?, असे प्रश्न अण्णा हजारे यांनी उपस्थित केले आहेत.
लोक व्यसनाधीन झाले की, आपल्याला जे साधायचं आहे, ते साधून घ्यायचं असा डाव आहे का? लोक व्यसनाने बरबाद झाले आहेत. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. ही बालकं आमची संपत्ती आहे. तसेच राज्य सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा झाल्याचं यावेळी अण्णा हजारे यांनी सांगितलं. काल सेक्रेटरी मुंबईहून आले होते. आमच्या चर्चा झाल्या. मी त्यांना म्हटलं की, लोकशाहीला मानता ना? मग लोकांमार्फत निर्णय का घेतला नाही? असं अण्णा हजारे यांनी बोलताना सांगितलं आहे.
दरम्यान, तुम्ही किराणा दुकानात वाईन ठेवून संस्कृती बरबाद करायला निघालात. त्यामुळे माझी जगायची इच्छा होत नाही. माझं वय 84 झालं आहे, खुप झालं. ईश्वराने खुप कामे करून घेतली. प्रजासत्ताक आहे या देशात. सेवकाने मालकाची परवानगी घ्यायला हवी. ही लोकशाही नाही तर हुकूमशाही होईल, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
काय सांगता??? फक्त 7 ते 8 रुपयात 100 किमी धावणार, ‘ही’ गाडी धमाल करणार!
प्रीति झिंटाने शाहरुख खानला विकत घेतलं, आर्यन-सुहाना बघतच राहिले
“अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेमधून बाहेर जावं लागेल”
“यमदेव घेऊन जातो तेव्हा त्याच्या जवळही रेडा असतो, म्हणूनच…”
“शिवसेनेेचे वाघ असतात, वाघांचा बाजार नसतो… भाजपने पाठीत खंजीर खुपसला”
Comments are closed.