आता शाहरूखची लेक होणार बच्चन कुटुंबियांची सून?

मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेता शाहरूख खानची(Shah Rukh Khan) लाडकी लेक सुहाना खान(Suhana Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत येत असते. परंतु यावेळी सुहाना खान तिच्या अफेअर्समुळं चर्चेत आली आहे.

सुहाना सध्या बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांचा नातू अगस्त्य नंदाला(Agastya Nanda) डेट करत असल्याची माहिती मिळाली आहे. अगत्स्य आणि सुहाना ‘द आर्चीज’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. आता या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगल्या आहेत.

नुकतेच कपूर कुटुंबियांनी ख्रिसमस निमित्तानं एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीतही अगत्स्य आणि सुहाना एकत्र दिसून आले होते. दोघेही आता बराच वेळ एकत्र घालवत आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

अगत्स्यनं सुहानाची कुटुंबियांसोबत ओळख करून देताना ‘जोडीदार’ म्हणून ओळख करून दिली आहे. महत्वाचं म्हणजे दोघंही हे नाते लपवण्याचा प्रयत्न करत नसल्याचे दिसत आहे.

दरम्यान, अगत्स्य हा अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन- नंदा यांचा मुलगा आहे. श्वेतानंही सुहानाला पसंत केलं आहे, अशाही चर्चा आहेत.

महत्वाच्या बातम्या-