मुंबई | सध्या इंधानाच्या दरानं उच्चांक गाठला आहे. त्यामुळं अनेकजण आता गाड्या खदेरी करताना इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत. त्यामुळं इलेक्ट्रिक वाहनांना दिवसेंदिवस महत्व प्राप्त होत आहे.
इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता आता गाड्या बनवणाऱ्या कंपन्याही नवनवीन फीचर्ससह वेगवेगळ्या इलेक्ट्रिक(Electric Vehicle) गाड्या बाजारात आणत आहेत. त्यातच आता Pure EV कंपनी लवकरच धमाकेदर फीचर्स असेलली इलेक्ट्रिक बाईक बाजारात लवकरच लाॅंच करणार आहे.
Pure EV कंपनीची लाॅंच होणारी बाईक कम्युटर इलेक्ट्रिक असणार आहे. या गाडीचं नाव EcoDrafty असणार आहे. यात 3kWh चा बॅटरी पॅक असणार आहे. त्यामुळं जर गाडी एकदा चार्ज झाली तर त्यावर 135 किमी पर्यंतचा प्रवास करू शकता.
ही गाडी लाल, काळा, निळा, राखाडी या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. या नवीन गाडीची किंमत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
या गाडीमध्ये 75 kmph चा टाॅप स्पीड मिळणार आहे, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळं या गाडीवर अतिशय आरामदायी प्रवास होणार आहे.
दरम्यान, कंपनीकडून या बाईकची किंमत आकर्षक असेल,असं सागण्यात आलं आहे. त्यामुळं जर तुम्ही इलेक्ट्रिक बाईक घेण्याच्या विचारात असाल तर तुम्ही या बाईकचा विचार करू शकता.
महत्वाच्या बातम्या-
- Share Market | ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं करोडपती
- ”सुषमा अंधारे वाघीण नाही तर माकडीण…”
- ‘मोर्चाला परवानगी दिली नाहीतर…’; राऊतांचा शिंदे सरकारला गंभीर इशारा
- मोठी बातमी! भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढल्या
- फोनवर पॉर्न व्हिडीओ बघत असाल तर आताच व्हा सावध, अन्यथा…